पावसाचा अंदाज : सध्या महाराष्ट्रातील हवामानाने एकच गोंधळ उडवून दिला आहे. कालच्या (३० मार्च) अवकाळी पावसाने आणि कडाडणाऱ्या विजांनी अनेक ठिकाणी सर्वांचीच तारांबळ उडवली. आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की, आज आणि येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हवामान कसे राहील? उन्हाळ्याच्या कडाक्यात अचानक आलेल्या या पावसाळी संकटामुळे विशेषतः शेतकरी बांधव चिंतेत आहेत. मित्रांनो, घाबरून जाऊ नका! आज आपण पुढील काही दिवसांच्या हवामानाचा अचूक आणि सविस्तर अंदाज पाहणार आहोत. हा अंदाज हवामान अभ्यासक तोडकर साहेब यांच्या व्हिडीओतील माहितीनुसार आहे. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या जिल्ह्यात कधी आणि किती पाऊस पडणार आहे!
आजची स्थिती (३१ मार्च): थोडा दिलासा, पण सतर्कता आवश्यक!
कालच्या भयंकर वातावरणाच्या तुलनेत आज पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी असणार आहे. आज प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग (जालना, नांदेड), लातूर, यवतमाळ, पुणे, सांगली, सोलापूर आणि धाराशिवच्या काही मोजक्या भागांत दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. तसेच, कोल्हापूर आणि बेळगाव (कर्नाटक) परिसरात संध्याकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांसाठी खास सूचना
आज दिवसभर जरी ऊन असले तरी संध्याकाळी ४-५ च्या सुमारास स्थानिक पातळीवर अचानक वातावरण बदलू शकते. त्यामुळे तुमची हळद किंवा उघड्यावर असलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. हा पाऊस कमी वाटत असला तरी तो जिथे पडेल तिथे नुकसान करू शकतो.
१ एप्रिल: महिन्याची सुरुवात कशी होईल?
उद्या, १ एप्रिलला कोल्हापूरपासून ते बेळगाव-हुबळीपर्यंत मेघगर्जनेसह काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता आहे. लातूर, परभणी, बीड (विशेषतः माजलगाव पट्टा), सोलापूर आणि धाराशिव या भागांतही ढगाळ वातावरण राहील. मात्र, नाशिक, धुळे, जळगाव आणि पुणे या पट्ट्यात उद्या पावसाचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.
येथे वाचा – कापूस-सोयाबीन भाव वाढले; सध्या एवढा मिळतोय भाव
२ आणि ३ एप्रिल: सर्वात मोठा धोका आणि हाय अलर्ट!
सर्वात महत्त्वाची आणि धोक्याची सूचना म्हणजे २ आणि ३ एप्रिलसाठी! या दोन दिवशी पुन्हा एकदा ३० तारखेसारखंच वादळी आणि भयानक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा मोठा फटका महाराष्ट्राला बसू शकतो.
• सर्वाधिक प्रभाव असणारे जिल्हे: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल.
• तसेच अमरावती, नागपूर, हिंगोली आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांनाही पावसाळ्यासारखाच अवकाळीचा चांगलाच तडाखा बसेल. या काळात घराबाहेर पडताना आणि शेतीची कामे करताना स्वतःची विशेष काळजी घ्या.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो एकाच मशीनवर करा सर्व कामे; हे मशीन छोट्या शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’
४ आणि ५ एप्रिल: वातावरणात हळूहळू सुधारणा
४ तारखेला धुळे, नंदुरबार (शहादा) या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात आणि पूर्व विदर्भात पावसाचे वातावरण पुन्हा थोडे सक्रिय राहील. ५ तारखेला मात्र हा पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होईल. जाता-जाता विदर्भाला काही हलके तडाखे बसू शकतात, पण त्यानंतर पुढील ६ ते ७ दिवस आकाश निरभ्र राहील आणि उन्हाळ्याचे वातावरण पूर्ववत होईल.
येथे वाचा – एप्रिलमध्ये तुरीचे भाव कसे राहतील? हमीभावाचा टप्पा ओलांडणार?